विरार  : समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी केलेले स्टंट आपण पाहिले असतील. अनेकांना या स्टंटबाजीमुळे आपला जीवही गमावावा लागतो. विरारमधला असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. काही हौशी कलाकारांनी आपली कार थेट समुद्रकिनाऱ्यावर नेली. मात्र वाळू खचल्याने कारला जलसमाधी मिळाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


वसईत समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या काही हौशी पर्यटकांनी आपली अर्टिगा कार थेट समुद्रकिनाऱ्यावर नेली. मात्र समुद्राला उधाण आल्याने कारखालची वाळू खचू लागली. ट्रॅक्टरच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न पर्यटकांकडून करण्यात आला, मात्र समुद्राच्या लाटांमुळे तो अयशस्वी ठरला.

समुद्र खवळलेला असल्यामुळे कार पाण्यात बुडू लागली. आपली कार बुडताना पाहण्याशिवार पर्यटकांसमोर कोणताही पर्याय नव्हता. मोठ्या प्रयत्नांनंतर कार पाण्याबाहेर काढण्यात यश मिळालं आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पाण्याशी खेळणं जीवावरही बेतू शकलं असतं हे पर्यटकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.

व्हिडीओ :