सतत होणारे लोकल अपघात आणि वाढती गर्दी यामुळे रेल्वेवर कॅगच्या या अहवालात लोकल सेवेवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. लोकलच्या गलथान कारभारावरही या अहवालातून लक्ष वेधण्यात आलं आहे.
कॅगच्या अहवालातील ठळक मुद्दे
- लोकल रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत.
- लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे प्रवासी अपघातांची आणि मृत्यूंची संख्या वाढत आहे.
- अनेक रेल्वे स्टेशन्सवर प्राथमिक सुविधांचा अभाव आहे.
- फर्स्ट एड किट, व्हील चेअर, स्वच्छतागृह, फलाटांवर निवारे, सरकते जिने अशा अनेक सुविधांचा अभाव आहे.
- विविध स्टेशन्सवर लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर्सच्या माध्यमातून होणाऱ्या तपासणीवर अधिकाऱ्यांचं लक्ष नसतं.
- अनेक ठिकाणी बुकिंग काऊंटर्सच्या सुविधाही आवश्यकतेप्रमाणे नाहीत.