मुंबई: राज्य मंत्रिमंडळात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये अहमदनगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय, तसेच उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षावरुन 60 वर्षे करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे.

 

  1. उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करून सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा निर्णय.


 

  1. ग्राहकांसाठीच्या विविध शुल्क आकारणीत सुसंगती यावी आणि वीज शुल्क वसुलीचे प्रमाण वाढावे यासाठी महाराष्ट्र वीज शुल्क अधिनियम 1958 रद्द करून त्याऐवजी महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक 2016 च्या प्रारुपास मान्यता.


 

  1. सर्वांसाठी घरे या महत्त्वाकांक्षी संकल्पाच्या पूर्तीसाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती.


 

  1. अहमदनगर जिल्ह्यातील हाळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय.


 

  1. महाराष्ट्र विधानपरिषदेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन 8 जुलै रोजी घेण्याचा निर्णय. (सभापती निवडीसाठी हे अधिवेशन बोलवण्यात आलं आहे.)


 

  1. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी व कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय या संस्थांना नागपूर जिल्ह्यात मंजूर केलेल्या जागेमध्ये व क्षेत्रामध्ये बदल करण्याचा निर्णय.