मुंबई : मुंबईतील प्रभाग क्र. ११६मध्ये (भांडुप पश्चिम) काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर आज (बुधवार) पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
या निवडणुकीत आपणच बाजी मारावी यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रभागामध्ये चांगलाच जम बसवला आहे. तर शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच प्रमिला पाटील यांचं निधन झालं. त्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
ही लढत शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केली असून या पोटनिवडणुकीनंतर आकड्यांचं गणित बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इथं विजय मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
दरम्यान, प्रमिला पाटील यांच्या सून जागृती पाटील भाजपकडून तर शिवसेनेच्या आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मिनाक्षी पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून प्रमिला सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्र. ११६ मधील सात ठिकाणी २९ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत प्रमिला पाटील यांनी ८३२६ मते मिळवून विजय मिळवला होता तर शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना ७८५७ मते मिळाली हेाती. त्यामुळे अवघ्या पाचशे मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला हेाता.
मुंबई : वॉर्ड क्र. ११६मध्ये पोटनिवडणूक, सेना-भाजपत चुरशीची लढत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Oct 2017 07:56 AM (IST)
या निवडणुकीत आपणच बाजी मारावी यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रभागामध्ये चांगलाच जम बसवला आहे. तर शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -