मुंबई:  मुंबईतल्या सांताक्रूझ बेस्ट बस डेपोमधील (Mumbai Santacruz Best Depot) शेकडो कंत्राटी बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बोनस, पगारवाढ न झाल्याने तसंच इतर मागण्याही पूर्ण न झाल्याने कर्मचारी संपावर गेले आहे.  मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे


सांताक्रूझ बेस्ट बस डेपो मधील शेकडो कंत्राटी बस कर्मचारी आज सकाळी अचानक संपावर गेले. दिवाळी आली तरी बोनस नाही. पगार 23 हजार 500 सांगून 18 हजार 500 दिला जातो,  सुट्ट्यांबाबत निर्णय नाही, अशा मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. आगर व्यवस्थापक सुरेश कलंत्रे म्हणाले, आम्ही कर्मचाऱ्यांना आव्हान केलं आहे. त्यांनी त्याचं जे म्हणण आहे ते द्यावं.  मी व्यवस्थापनाकडे त्यांच्या मागण्या मांडणार आहे. त्यांचं निवेदन थोड्याच वेळात मिळेल. या अगोदर  कधीही त्यांनी मागणी केली नव्हती. सकाळी केवळ चार बस बाहेर पडल्या. आता कर्मचाऱ्यांचे निवेदन आलं की, गाड्या सुरळीत होतील,


कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत?


1. दिवाळी बोनस देण्यात आलेला नाही


2.  वाहकाचा पगार अठरा हजार पाचशे असून तो 12500 दिला जातो तर चालकाचा 23500 असून तो केवळ अठरा हजार दिला जातो त्यामुळे पगारात वाढ करण्यात यावी


3. बेस्टमध्ये काम करत असून देखील कामावर येण्यासाठी तिकीट काढावे लागते हा प्रवास मोफत करावा.



मुंबईतल्या सांताक्रूझ डेपोतील कर्मचाऱ्यांनी आज सकाळी अचानक संप केल्यामुळे सांताक्रुज डेपोतली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याच पाहायला मिळत आहे. मागील जवळपास साडे चार तासांपासून कर्मचारी आणि प्रशासन यांच्यासोबत बातचीत सुरू असून अजूनही संपावर तोडगा निघाला नसल्याच पाहायला मिळत आहे. याबाबत प्रशासनाकडून आम्ही तत्काळ कर्मचाऱ्यांच निवेदन घेऊन पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर कर्मचार्‍यांकडून आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा घेण्यात आल्याच पाहायला मिळत आहे.  बोनसची मागणी करणाऱ्या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज केला आहे. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. आज सकाळपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगारासाठी सांताक्रूझ बेस्ट डेपो समोरं काम बंद आंदोलन सुरू आहे


संबंधित बातम्या :


Bus Fare Hike: एसटीच्या वाढीव तिकिट दराच्या दीडपट दर आकारणीस खाजगी ट्रॅव्हल्सला परवानगी, पण...