Diwali Kits : राज्यभरात मोठ्या उत्साहात दिवाळी (Diwali) साजरी केली जात आहे. या दिवाळीत महागाईचा भडका उडालेला असताना नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी राज्य सरकारनं शंभर रुपयांमध्ये दिवाळी किट (Diwali Kits) देण्याची घोषणा केली होती. पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला होता. मात्र, दिवाळीला सुरुवात झाली तरी अद्याप अनेक रेशनिंगच्या दुकानातून या किटचं वाटप सुरु झालं नाही. मात्र,अशातच मुंबईच्या चांदीवली विभागात शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे (MLA Dilip Lande) यांनी विभागात 16 हजार दिवाळी साहित्याच्या किटचं वाटप केलं आहे.
100 रुपयात दोन किलो साखर, दोन किलो मैदा, दोन किलो रवा
चांदीवली विभागातील नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी विभागात 16 हजार दिवाळी साहित्य किटचे वाटप केले आहे. यात दोन किलो साखर, दोन किलो मैदा, दोन किलो रवा असे सर्व साहित्य 100 रुपयात वाटण्यात आलं आहे. हे वाटप अजून ही सुरू आहे. हे किट घेण्यासाठी लोकांच्या भल्या मोठ्या रांगाही लागत आहेत. अश्या वेळी जेव्हा रेशनिंग दुकानात हे साहित्य उपलब्ध नसताना शिंदे गटाकडून मात्र याचे वाटप सुरू असल्याने नागरिकांना प्रश्न पडला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्याच आदेशाने हे वाटप सुरू करण्यात आल्याचे लांडे यांनी सांगितले.
घोषणा करुन 15 दिवसांपेक्षा जास्त झाले तरी शिधा रेशनपर्यंत नाही
दिवाळी सण म्हटला की घराघरात फराळ हा आलाच. मात्र, काही गरिबांना दिवाळी साजरी करता येत नाही. अशा लोकांना देखील आनंदाने दिवाळी साजरी करता यावी या हेतून सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा योजनेची घोषणा करुन जवळपास 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. परंतू, हा शिधा अद्याप रेशनपर्यंतच पोहोचला नाही. त्यामुळं लोक रेशनधान्य दुकानांपर्यंत फक्त धडका मारुन परत जात आहेत. त्यामुळं सरकाचा हा आनंदाचा शिधा अद्याप कागदावरच आहे. कारण दिवाळीच्या सणाला सुरूवात झाली आहे. आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे. आज धनत्रयोदशी आहे. दिवाळी झाल्यानंतर सरकारचा हा शिधा मिळणार काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. रेशनिंग दुकांमध्ये आनंदाचा शिधा योजनेतील सर्व वस्तू आल्या नसल्याने वाटप सुरू करण्यात आले नाही. दरम्यान लोकांच्या रोषाला सामोरे जाण्यापेक्षा काही ठिकाणी तर रेशनिंग दुकानेच बंद ठेवण्यात आली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: