उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून महिला-चिमुकला जखमी
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2016 06:25 PM (IST)
उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळून एक महिला आणि बाळाला दुखापत झाली आहे. चोपडा कोर्टजवळ आंबेडकर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि इमारतीतील 40 फ्लॅटधारकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. सध्या संपूर्ण इमारत खाली करण्यात आली असून इमारतीला सील करण्यात आलं आहे. या सर्व रहिवाशांची सोय एका शाळेत करण्यात आली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर इमारतीबाबत निर्णय घेतला जाईल असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.