भिवंडी : भिवंडीतील खाडीपार भागातील एकता चौकात तीन मजली इमारत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, तर सात जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. फॉजान सुसे ही आठ वर्ष जुनी इमारत शेजारच्या चाळीवर कोसळली. यामध्ये 25 वर्षीय खैरुननिशा इस्माइल शेख या महिलेला प्राण गमवावे लागले. ढिगाऱ्याखालून सात जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून यामध्ये दोन वर्षांच्या मोहम्मद उमर इस्माइल शेख या चिमुरड्याचा समावेश आहे. दुर्घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं. इमारत कोसळलेल्या ठिकाणी बचावकार्यासाठी अग्निशमन दलाकडून मदत घेण्यात आली. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या जखमींची नावं
1. मरियम शेख (9)
2. सफिया युशुफ सरदार (60)
3. झरार अहमद शेख (45)
4. मुन्नाभाई चायवाला  (45)
5. मैहरुनिशा  शेख (40)
6. मोहम्मद उमर इस्माइल शेख (2)
7.  खातून बी सैय्यद  (45)