मुंबई : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने चलन तुटवडा निर्माण झाला आहे. चलन तुटवड्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहेच, पण काहींचे लग्नासारखे प्रस्ताविस्त सोहळेही अडचणीत सापडले आहेत. पैसे बदलण्यासाठी आणि जमा करण्यासाठी बँकांबाहेर मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. या रांगांमध्ये कॉलेज तरुण-तरुणी, नोकरदार, वृद्धांपर्यंत सगळेच उभे आहेत. त्यातच आता या रांगेत वधू पाहायला मिळाली, जिचं लग्न 25 नोव्हेंबर रोजी आहे.
एक दिवसाच्या सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा बँका सुरु झाल्या. पैसे बदलण्यासाठी आणि जमा करण्यासाठी रांगा लावल्या आहे. या रांगेत प्रीती सिंह ही तरुणीही होती. प्रीती रविवारपासून बँकेत चकरा मारत आहे. पण अजून तिचा नंबर आलेला नाही. एवढ्या अडचणी येऊनही ती सरकारचा निर्णय योग्य असल्याचं सांगते.
मुंबईतील मलाड परिसरात एसबीआयच्या बँकेबाहेर प्रीती सिंह उभी असली. येत्या 25 नोव्हेंबरला तिचं लग्न आहे. तिचे वडील धनंजय सिंह रिक्षाचालक आहेत. नोटबंदीमुळे मुलीचं लग्न कसं होणार, याची चिंता त्यांना सतावत आहे.
बँकेच्या चकरा मारल्यानंतर धनंजय सिंह संध्याकाळी दोन तास रिक्षा चालवतात. मुलीच्या लग्नासाठी सध्या लोकांकडून उधार घेत आहेत आणि मुलीसोत बँकेच्या फेऱ्या मारत आहेत.