ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकलमधील शनिवारी संध्याकाळची ही घटना असल्याची प्राथमिक माहिती आहे. या तरुणीने ट्विटरवर केलेल्या पोस्टमधील माहितीनूसार, शनिवारी संध्याकाळी 6 वाजून 32 मिनिटांची लोकल या तरुणीने पकडली असता महिलांच्या पहिल्या दर्जाच्या डब्यात हा मुलगा चढला होता. त्यानंतर या मुलाने डब्यातील महिलांसमोर हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. लोकलमधील डब्यात सुरु असलेला हा अश्लील आणि घाणेरडा प्रकार पाहून तिथे असलेल्या सर्वच महिला प्रवासी घाबरून गेल्या होत्या. यावेळी एका तरुणीने या मुलाचा व्हिडीओ बनवून ट्विटरवर टाकत मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. लोकलच्या डब्यातील महिलांनी या मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो जायलाही तयार नव्हता, 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतर त्याला डब्याबाहेर काढता आलं असं देखील तरुणीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
या घटनेनंतर मुंबईतील लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांकडून या मुलाचा शोध घेण्यात येत आहे.
महिला, मुलीशी अश्लिल चाळे करणारा माथेफिरु अटकेत