मुंबई : मुंबई विद्यापीठाचा कारभार सुधारत नसेल, तर थेट टाळं लावा, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. मुंबई विद्यापीठाने लॉ शाखेच्या अभ्यासक्रमात यंदाच्या शैक्षणिक वर्षात 60:40 पॅटर्न आणून गोंधळ वाढवला आहे.
यंदाच्या वर्षी कायदा शाखेच्या सर्व वर्षात 60:40 पॅटर्न लागू करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतल्यावर अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. हा पॅटर्न रद्द व्हावा, यासाठी लॉच्या काही विद्यार्थ्यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाकडून विद्यापीठाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. विद्यापीठाचा कारभार सुधारत नसेल, तर थेट विद्यापीठाला टाळं लावावं, अशा शब्दात आज कोर्टाने विद्यापीठाच्या कामकाजावर ताशेरे ओढले.
यावेळी विद्यापीठाच्या वकिलांनी पुढील कागदपत्रं सादर करण्यासाठी कोर्टाकडे सोमवारपर्यंत मुदत मागितली असल्याने याचा निकाल जाणून घेण्यासाठी आता सोमवारची वाट बघावी लागणार आहे.
कारभार सुधारत नसेल, तर मुंबई विद्यापीठाला टाळं लावा : कोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Oct 2018 08:23 PM (IST)
यंदाच्या वर्षी कायदा शाखेच्या सर्व वर्षात 60:40 पॅटर्न लागू करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतल्यावर अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -