8 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात वैद्यकीय परीक्षा सुरू होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला विरोध करत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचसी) अंतिम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमाच्या नऊ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. एमयूएचसीने 21 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला या याचिकेमार्फत आव्हान दिले होते. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरित्या हजर राहून परीक्षा देण्याचे आदेश एका परिपत्रकातून देण्यात आले आहेत. त्यालाच या विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. संबंधित याचिकेवर शनिवारी तातडीने न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
अशा होणार अंतिम वर्षातील परीक्षा; कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची माहिती
याचिकाकर्त्यांनी शेवटच्या क्षणाला हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्यामुळे याप्रकरणात आम्ही परीक्षेला स्थगिती देत अंतरिम दिलासा देऊ शकत नाही असं स्पष्ट मत खंडपीठाने आपल्या आदेशात नोंदवत याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या 17 ऑगस्ट रोजीच्या जेईई-मुख्य आणि एनईईटी (NTTE)परीक्षा पुढे ढकलण्यासही नकार देण्याच्या आदेशाचा दाखलाही खंडपीठाने यावेळी दिला. जरी बाहेर कोरोनामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली असली तरी त्यातूनच आता पुढे जाणं भाग आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य ऐवढा प्रदिर्घ काळ दावणीला बांधणे योग्य नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचा संदर्भ खंडपीठाने आपल्या आदेशात देत याचिकेवरील सुनावणी 17 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
Exam Pattern | विद्यापीठ परीक्षांचा अधिकृत पॅटर्न सर्वात आधी 'माझा'वर, प्रमोद येवले यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत