मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात चार दिवस ध्वनीक्षेपक आणि ध्वनिवर्धक रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषण वाढत असल्यामुळे काही वर्षांपासून रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुंबईमध्ये 365 दिवसांपैकी 15 दिवस रात्री 10 ऐवजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर मर्यादित आवाजामध्ये वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात गणेशोत्सवाच्या चार दिवसांमध्ये सूट मिळणार आहे.
यावर्षी कोल्हापूरकरांनी याच दृष्टीनं एक स्वागतार्ह निर्णय घेतला आहे, तो म्हणजे कोल्हापूर डॉल्बिमुक्त करण्याचा. कोल्हापूरकरांनीसुद्धा या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. राज्यभरात या बाबीचं अनुकरण करण्यात आलं तर गणेशोत्सव निश्चितच सुखकर होईल.