आठवडाभर गढूळ पाण्याचा पुरवठा, मुंबईकरांना पाणी उकळून पिण्याचं आवाहन
एबीपी माझा वेब टीम | 05 May 2018 05:04 PM (IST)
येत्या 7 दिवसांमध्ये मुंबईकरांनी पाणी उकळूनच पिण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. येत्या काही दिवसात मुंबईत गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने ही सूचना जारी केली आहे.
मुंबई : येत्या 7 दिवसांमध्ये मुंबईकरांनी पाणी उकळूनच पिण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. येत्या काही दिवसात मुंबईत गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने ही सूचना जारी केली आहे. घाटकोपर जलाशयाच्या टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलाशय 7 मे पासून सुरु होणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा मुंबईकरांना होणार आहे. विशेषतः बीएमसीच्या एल आणि एन या विभागांमध्ये जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसंच प्रामुख्याने कुर्ला आणि घाटकोपर भागातील नागरिकांनी येत्या 7 तारखेपासून पुढचा आठवडाभर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे.