पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू बंदराच्या समोर एक नौका बुडाली. या नौकेतील 9 जणांना वाचवण्यासाठी गेलेली नौका बेपत्ता आहे. काल संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.


गुजरात राज्यातून मासेमारीसाठी आलेली (जीपीएस नंबर 19507200) 'राम प्रसाद' ही नौका वादळी वारे आणि तुफानी लाटांच्या तडाख्याने काल 5 वाजण्याच्या सुमारास बुडाली. या नौकेमधून समुद्रात बुडत असलेल्या 9 मच्छीमारांना नवाबंदर येथील 'प्रेम साई' या मच्छीमार नौकेतील मच्छीमाराने वाचवलं.

ज्या प्रेमसाई बोटीतील मच्छीमारांनी राम प्रसाद नौकेतील लोकांना वाचवलं, ती नौका आता गायब असून त्यांच्याशी अजूनपर्यंत काहीही संपर्क झालेला नाही. या नौकेत जवळपास 15 ते 20 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.