मुंबईः फेब्रुवारी 2017 मध्ये होणार्‍या मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वॉर्डांची पुनर्रचना याच महिन्यात होणार आहे. एकूण प्रभागांची संख्या 227 इतकीच राहणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुक यांनी दिली.

 

शहरातील लोकसंख्या 3 टक्क्यांनी घटली असून उपनगरातील लोकसंख्या 8 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे शहरातील नगरसेवकांची संख्या कमी तर उपनगरातील नगरसेवकांची लोकसंख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

 

मतदारयाद्या अद्ययावत करणार

मतदार नोंदणीसाठी अभिनेते अशोक सराफ, प्रशांत दामले, स्वप्निल जोशी जनजागृती करणार आहेत. महापालिका निवडणुकांसाठी यादीत 31 ऑगस्टपर्यंत मतदारांना आपले नाव समाविष्ट करता येईल. मतदार नोंदणी करण्यासाठी, नावे वगळण्यासाठी, चुका दुरुस्ती करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत आहे.

 

निवडणुकांमध्ये गेल्या काही मतदानाची सरासरी टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी होती. त्यामुळे येत्या निवडणुकीत ही टक्केवारी वाढवण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध कार्यक्रम आखले आहेत. या निवडणुकीसाठी विधानसभेची मतदार यादी वापरली जाणार आहे. त्यात नाव नोंदवण्यासाठी पालिकेने मतदारांना आवाहन केलं आहे.