BMC Water Cuts : संपूर्ण मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांत मुंबई महापालिकेतर्फे 15 टक्के पाणीकपात (Water Cuts), तर काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे भांडुप संकुल येथील जुन्‍या महासंतुलन जलाशयापासून सुरु होणाऱ्या तानसा जलवाहिनीचे आणि बीपीटी लाईनचे (ब्रेक प्रेशर टनेल), नवीन महासंतुलन जलाशयातून निघणाऱ्या तानसा जलवाहिनीबरोबर छेद जोडणी करण्‍याचं काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुल येथील 1910 दशलक्ष उदंचन केंद्रातील दोन 1200 मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलणं आणि येवई येथे नवीन तानसा जलवाहिनीवरील क्‍लोरिन इंजेक्‍शन लाईनवरील झडप बदलण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. 


मुंबई शहर आणि उपनगरांत हे काम गुरुवार दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच, सकाळी 10 वाजेपासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. यास्तव, सदर कालावधीत संपूर्ण मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांत 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तर काही ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.


कोणत्या भागांत पाणीकपात, कोणत्या भागांत पुरवठा बंद? 


पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे आणि शहर या विभागातील संपूर्ण क्षेत्रात 15 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. भांडुप मध्ये गावदेवी टेकडी, सर्वोदय नगर येथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तर गावदेवी टेकडी, सर्वोदय नगर, कांजुर (पश्चिम) ते विक्रोळी स्थानकासह लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा दोन्ही बाजूंचा परिसर, सुर्यानगर, चंदन नगर, विक्रोळी स्थानक मार्ग (पश्चिम), रमाबाई नगर I आणि II  येथेही पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. साई हिल, टेंभीपाडा, एँथोनी चर्च, कामराज नगर परिसर, पाटकर कंपाऊंड परिसर येथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तसचे, महाराष्ट्र नगर, फरिद नगर, काजू टेकडी, कांबळे कंपाऊंड येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.


बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे भांडुप संकुल येथील जुन्‍या महासंतुलन जलाशयापासून सुरु होणाऱ्या तानसा जलवाहिनीचे आमि बीपीटी लाईनचे (ब्रेक प्रेशर टनेल) आणि नवीन महासंतुलन जलाशयातून निघणाऱ्या तानसा जलवाहिनीबरोबर छेद जोडणी करण्‍याचे काम करण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुल येथील 1910 दशलक्ष उदंचन केंद्रातील दोन 1200 मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलणे आणि येवई येथे नवीन तानसा जलवाहिनीवरील क्‍लोरिन इंजेक्‍शन लाईनवरील झडप बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पाणी कपात करण्यात येणार आहे.