मुंबई : मुंबई महापालिका लवकरच शहरातील धोकादायक पुलांची दुरुस्ती करणार आहे. धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा निर्णय महापालिकेने घेतला असून शहरातील महत्त्वाच्या आठ पुलांची मोठी दुरुस्ती यामध्ये करण्यात येणार आहे. गुरुवारी (28 फेब्रुवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव पार करण्यात आला.
या आठ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून त्यानंतर या पुलंच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिका सुमारे 16 कोटी 91 लाख 14 हजार 962 रुपये खर्च करणार आहे.
अंधेरी रेल्वे ब्रीज दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे महापालिका हद्दीतील पुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील 344 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. यानंतर 223 पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरु असून 176 पुलांची किरकोळ दुरुस्तीचे काम सुरु आहे. यामध्ये 47 पुलांची दुरुस्ती तातडीने हाती घेण्यात आली आहे.
तर या धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीत गुरुवारी मंजूर झाला. त्यामुळे लवकरच महापालिका याचं काम हाती घेईल. यात रेल्वेचीही मदत घेतली जाणार आहे.
या पुलांची होणार दुरुस्ती
1. महालक्ष्मी इथला रेल्वेवरील उड्डाणपूल
2. करी रोड स्टेशन उड्डाणपूल
3. शीव स्टेशन इथला रेल्वेवरील उड्डाणपूल
4. शीव (सायन) हॉस्पिटल धारावी इथला रेल्वेवरील उड्डाणपूल
5. दादर इथल्या रेल्वेवरील टिळक उड्डाणपूल
6. दादर फूल मार्केटजवळील पादचारी पूल
7. माहिम फाटक इथला पादचारी पूल
8. धारावी येथील दादर धारावी नाल्यावरील पादचारी पूल
मुंबईतील आठ धोकादायक पुलांची दुरुस्ती होणार
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
01 Mar 2019 06:40 AM (IST)
या आठ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून त्यानंतर या पुलंच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिका सुमारे 16 कोटी 91 लाख 14 हजार 962 रुपये खर्च करणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -