मुंबई : मुंबईकरांनो कचरा निर्माण करतानाच काळजी घ्या. कारण येत्या काळात स्वच्छ मुंबईसाठी कचऱ्यावर अतिरिक्त कर लावण्याचा पालिकेचा विचार आहे. कचऱ्यावर कर आकारत नसल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये गेल्या वर्षी मुंबई महापालिकेचे मानांकन घसरले होते. त्यामुळे हा कर लावण्याची तयारी पालिकेने केली असल्याची माहिती आहे.
कचऱ्यावर मुंबई महापालिका सध्या कोणताही कर आकारत नाही. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये गेल्या वर्षी मुंबई महापालिकेचे मानांकन घसरलं होतं. अखेर मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी आणि मानांकन टिकवण्यासाठी हा कर लावण्याची तयारी मुंबई महापालिकेने केली असल्याचे समजते.
कचऱ्यावर कर लावण्याबाबत अद्याप अभ्यास सुरु आहे. ते निश्चित झाल्यानंतर पालिकेकडून प्रस्ताव तयार करण्यात येईल.
महत्वाचं म्हणजे जे मुंबईकर स्वत: ओला कचरा-सुका कचरा वेगवेगळा करतील आणि ओल्या कचऱ्यावर त्यांच्याच जागेत प्रक्रिया करतील. त्यांना मालमत्ता करातून 10% पर्यंत सूट मिळेल, असाही पालिकेचा विचार आहे.