अशोककुमार शामजी तवाडिया या पालिका अभियंत्याच्या अहवालात मंत्रिमहोदयांचा उल्लेख आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर प्रकाश मेहतांनी दबाव टाकल्याचा आरोप केला जात आहे.
मुंबईतील पाईपलाईन लगतच्या वाढत्या झोपड्यांविरोधात हायकोर्टात याचिका केली आहे. सामाजिक कार्यकर्ता भगवानजी रयानी यांनी ही याचिका दाखल केली आहे. एन वॉर्डात वारंवार तक्रार करुनही कारवाई होत नसल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे.
टिळक नगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला स्टेशन डायरीसह हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हायकोर्टाने राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाधिवक्त्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.