मुंबई : मुंबईच्या महापौरांनी पालिका कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा ऑडिओ एबीपी माझाच्या हाती लागली आहे. या क्लिपमध्ये मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर एका पालिका अधिकाऱ्याला धमकी देताना स्पष्टपणे ऐकू येत आहे. नियमांनुसार परवाने रद्द करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला महापौर महाडेश्वर जाब विचारत आहेत. तुम्ही परवाने रद्द केले, आता तुम्हाला निलंबित करतो असं बोलताना महाडेश्वरांचा आवाज ऑडिओ क्लिपमध्ये कैद झालाय.


जितेंद्र नावाच्या पालिका कर्मचाऱ्याला नोटीस बजावल्याप्रकरणी जाब विचारला. कर्मचाऱ्यानं वरिष्ठांच्या आदेशाचं पालन केल्याचं सांगितलं. तसंच अटी शर्तींचं पालन न केल्यामुळे नोटीस पाठवल्याचं कर्मचाऱ्यानं सांगितलं. यावर तुम्ही तरी कुठे पालन करता, आता तुला पण कामावरुन कमी केलं पाहिजे असं महाडेश्वर कर्मचाऱ्याला बोलताना रेकॉर्ड झालं आहे. यानंतर कर्मचाऱ्यानं वरिष्ठांशी बोलण्याची विनंती महापौरांना केली.

दरम्यान एबीपी माझानं महापौरांना याप्रकरणी विचारलं असता, त्यांनी ही ऑडिओ क्लिपिंग आपलंच असल्याचं मान्य केलं. तसंच इतके दिवस कर्मचाऱ्यानं आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आपण त्याला झापल्याचं स्पष्ट केलं आहे.

पाहा व्हिडिओ :