BMC Mayor Kishori Pedanekar on BJP : भाजपकडून (BJP) सातत्यानं होत असलेल्या आरोपांवर महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की, गेल्या 25 वर्षात 5 वर्ष सोडली तर 20 वर्ष सोबतच होतात ना. तेव्हा काय मेंदूला गंज लागला होता आणि आता उतरलाय का? असा सवाल त्यांनी केला. गेल्या 25 पैकी 20 वर्षात मांडीला मांडी लावून काय, आमच्या मांडीवरच बसला होतात ना. 20 वर्ष सगळी पदं उपभोगली ना त्याचा हिशेब पण द्या असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात भाजप अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. यावर महापौर म्हणाल्या की, मुख्यमंत्री बरोबरच बोलतात "प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही". अविश्वास ठराव हा सगळ्यांचा सहमतीने घ्यावा लागतो. स्थायी समितीमध्ये चर्चा होत होती तेव्हा का बोलले नाही. मला पत्र आले मी नोंद घेतली आहे, असं त्या म्हणाल्या. महापौर म्हणाल्या की, मुख्यमंत्री बरोबरच बोलतात "प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही".
इकबाल चहल यांची बाजू घेतली
महापौर म्हणाल्या की, विरोधकांनी विरोधी अजेंडा घेतलाय. नुसतं बोलत बसू नका, दाखवून द्या. इकबाल चहल हे हिटलिस्टवर आहेत. कारण या आयुक्तांनी कोविड काळात उत्तम काम केलंय. हीच विरोधकांची पोटदुखी आहे, असं त्या म्हणाल्या.
पाळीव प्राण्यांसाठी शवदायिनी बांधली जाणार
महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं की, मुंबईत सर्वात प्रथम पाळीव प्राण्यांसाठी शवदायिनी बांधली जाणार. प्राण्यांच्या शवदायिनीची प्रतिकृती यावेळी त्यांनी दाखवली. पाळलेल्या जनावरांची अंतिम क्रिया व्हावी याकरता मुंबई महापालिके ही सोय करण्यात आली आहे.
महापौरांनी सांगितलं की, महिनाभरात महापालिका हॉस्पिटलमध्ये एकूण 300 कोविड पॉझिटीव्ह गर्भवती महिला सध्या अॅडमिट आहेत. यापैकी 170 प्रसूती झाल्या आहेत. तर, कोरोनाकाळात आतापर्यंत महापालिका हॉस्पिटलमध्ये एकूण 1300 कोविड पॉझिटीव्ह गर्भवती महिलांची प्रसुती करण्यात आलीय, असं त्यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Covid19 Vaccine : महाराष्ट्राकडे लसीचा पुरेसा साठा, लसीअभावी लसीकरणात अडचण नाही; केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण
- Boris Johnson Controversy : प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्काराच्या पूर्वसंध्येला बोरिस जॉन्सन यांच्या कर्मचार्यांची पार्टी, सरकारने ब्रिटनच्या महाराणीची माफी मागितली
- Immunity Booster : हिवाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती, 'या' फळांमधून शरीराला मिळतील सर्व आवश्यक व्हिटामिन्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha