महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे.
मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. मात्र शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून मुंबईचा महापौर आपल्याच पक्षाचा असेल, असा दावा करण्यात येतोय. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेनं उचललेलं पाऊल महत्त्वाचं मानलं जातंय.
गट स्थापन केल्याने काय होईल?
महापौर निवडीवेळी दगाफटका टाळणे हे गट स्थापन करण्याचं मुख्य उद्दीष्ट असतं. शिवसेनेने जो गट स्थापन केला, त्याचा उद्देश तोच आहे. या गटाची नोंद कोकण विभागीय आयुक्तांसमोर करावी लागते. या गटाचा व्हिप त्या गटाला लागू असतो. शिवसेनेने स्वत:चे 84 आणि अपक्ष 4 असे 88 जण एका गटाचे आहोत, असं या गटाद्वारे आयुक्तांना सांगितलं.
त्यामुळे प्रत्यक्ष महापौर निवडीवेळी दगाफटका झाला तर संबंधित नगरसेवकाचं निलंबन होऊ शकतं.
त्यामुळे महापौर निवडीच्या दृष्टीने शिवसेनेने सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री दिल्लीत
राज्यात सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये कोंडी सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत. पर्यावरण विभागाच्या बैठकांच्या निमित्ताने ते दिल्लीत असतील. मात्र याठिकाणी ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची ते भेट घेणार असल्याचं समजतंय.
भाजपच्या मदतीशिवाय अन्य कोणाचेही सहकार्य घेऊन महापौरपद मिळवायचे, हा शिवसेनेचा निर्धार असून उभयपक्षी कोंडी पुढील काही दिवस तरी कायमच राहणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांची भेट महत्त्वाची मानली जातेय.
संबंधित बातम्या
BMC election result : मुंबई महापालिका वॉर्डनिहाय निकाल
मुंबईत 30-35 जागांवर शिवसेनेला मनसे फॅक्टर महागात
शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ
मुख्यमंत्री दिल्ली दरबारी, शिवसेनेसोबतच्या कोंडीवर चर्चा?
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपवर फोडाफोडी करण्याची वेळ?
मनसेच्या सात नगरसेवकांची शिवसेनेला साथ?
काँग्रेसशी युतीच्या चर्चेचा प्रश्नच नाही : आशिष शेलार
शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ
दगाफटक्याची चिंता नाही, महापौर शिवसेनेचाच : अनिल परब
शिवसेनेनं महापौरपदासाठी काँग्रेसची मदत मागितली मात्र आमचा नकार: निरुपम
शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले
युती होणार का? आशिष शेलार म्हणतात…
राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला?
तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87
युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण