दादरमध्ये काँटे की टक्कर, स्वप्ना देशपांडे विरुद्ध विशाखा राऊत
एबीपी माझा वेब टीम | 03 Feb 2017 06:30 PM (IST)
मुंबई: दादरमधून शिवसेनेच्या माजी महापौर आणि माजी आमदार विशाखा राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर त्यांच्याविरोधात मनसेकडून संदीप देशपांडेंच्या पत्नी स्वप्ना देशपांडेंनी उमेदवारी दाखल केली. त्यामुळे दादरमधल्या 191 वॉर्डमधील लढत रंगतदार होणार आहे. गेल्यावेळी महापालिकेच्या निवडणुकीत दादरमध्ये मनसेनं जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला होता. आता पुन्हा एकदा हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. तर भाजपकडून किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा ओक यांना उमेदवारी देणार अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी भाजपनं डॉक्टर तेजस्वीनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. संबंधित बातम्या