ठाणे : ठाण्यातील बंडाळी काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीय. शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक बाळा घाग यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
बाळा घाग आणि पत्नी संगीता घाग यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिवसेनेने ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांना उमेदवारी दिल्याने बाळा घाग नाराज आहेत. त्यामुळे बाळा घाग बंडखोरी केली आहे.
शिवसेनेतील बंडखोरी
- मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख अभिषेक सावंत यांच्या पत्नी आदिती सावंत वॉर्ड क्र. 200मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार
- प्रभादेवीमध्ये शिवसेनेविरोधात बंडाळी, शिवसेनेचे महेश सावंत अपक्ष निवडणूक लढवणार
- मुंबईत माहिम भागातील वॉर्ड क्रमांक 190 मधून शिवसेनेने वैशाली पाटणकर यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेच्या महिला शाखाप्रमुख रोहिता ठाकूर नाराज झाल्या आहेत. रोहिता यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
आतापर्यंत शिवसेना सोडलेले नगरसेवक
नाना आंबोले - लालबाग परळ
दिनेश पांचाळ - अणुशक्ती नगर
प्रभाकर शिंदे - मुलुंड