मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी खड्डे बुजवण्यासाठी दिलेली डेडलाईन आज संपली आहे. मात्र शहरातल्या रस्त्यांची झालेली चाळण पाहता, खड्डे बुजवण्याचं काम अजूनही पूर्ण झाला नसल्याचं समोर आलं आहे.

सोमवारपर्यंत मुंबईतले खड्डे बुजवले जावेत, असे आदेश आयुक्तांनी कंत्राटदारांना दिले होते. त्यानुसार युद्धपातळीवर कामही सुरु कऱण्यात आलं होतं. मात्र हे काम काही पूर्ण झालेलं दिसत नाही.

खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र नगरचा रस्ता आजही खड्ड्यातच आहे. त्यामुळे आता डेडलाईन संपल्यावर पालिका कंत्राटदारांवर कोणती कारवाई करते, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागूल राहिलं आहे.