मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळाली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने महापालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.


विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू असताना कोणतेही निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे आधीच महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सानुग्रह अनुदान मंजूर केलं आहे. यंदा कोणत्याही कामगार संघटनेच्या मागणीशिवाय प्रशासनाने कर्मचाऱ्यांना 15 हजारांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने याबाबतचे परिपत्रकच जारी केले आहे.

त्यामुळे आगामी वेतनामध्ये या सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनात जमा केली जाणार आहे. पूर्णवेळ महापालिका कर्मचाऱ्यांना सरसकट 15 हजार सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी कर्मचाऱ्यांना 15 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते.


त्याआधीच्या वर्षी 14 हजार 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले. त्यामुळे मागील वर्षी ५०० रुपयांची वाढ करून १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. परंतु यंदा त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.