मुंबई : विधानसभा निवडणुकीत युतीच्या जागावाटपाबदद्ल अनेक समीकरणे समोर येत असताना शिवसेना आणि भाजप युती शंभर टक्के होईल असा दावा भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेचं ज्यांना अधिकार नाही त्यांनी युतीबद्दल बोलू नये असा टोला महाजन यांनी शिवसेना नेते दिवाकर रावतेंना लगावला आहे.


विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य दिवाकर रावतेंनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या मुलाखतीच्या कार्यक्रमात केलं होतं. त्यालाचं उत्तर देताना महाजन यांनी युतीबाबत बोलण्याचा अधिकार फक्त तीन वरिष्ठ नेत्यांना असून, बाकीच्यांनी मध्ये बोलू नये असा सल्ला दिला. तसेचं महाजनादेश यात्रेच्या समारोपानंतर युतीच्या चर्चेला पुन्हा सुरुवात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

येत्या चार ते पाच दिवसात युतीचा तिढा सुटणार असल्याचा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे. तसेच दोन-तीन दिवसात आचारसंहिता लागेल, तोपर्यंत युतीचा अंतिम निर्णय होईल असही ते म्हणाले.

Girish Mahajan | ज्यांना अधिकार नाही त्यांनी युतीबद्दल बोलू नये : गिरीश महाजन | ABP Majha



युतीवर केलेलं रावतेंच विधान चुकीचं नाही : संजय राऊत

शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटणार या रावतेंच्या विधानचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. अमित शाह आणि मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत याआधीचं जर 50-50चा फॉर्मुला ठरला आहे, तर रावतेंनी केलेलं विधान मला काहीही चुकीचं वाटतं नाही असं मतं राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

Shivsena-BJP Alliance | 144 जागांबाबत दिवाकर रावतेंचं विधान योग्यच : संजय राऊत | ABP Majha