पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांना हात जोडून नमन करत आहेत, तर पोस्टरच्य एका कोपऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. या तीन फोटोंशिवाय पोस्टरवर कुणालाही स्थान देण्यात आले नाही. अगदी भाजपच्या मुंबई अध्यक्षांनाही पोस्टरवर जागा देण्यात आली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या मेळाव्यात राज्यातील अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यासह भाजप नेते काय प्रत्युत्तर देतात याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.