मुंबई: मुंबईच्या प्रचारासाठी संजय निरुपम सक्षम आहेत. मला 25 जिल्ह्यात जायच आहे. त्यामुळे मी मुंबईच्या प्रचारात सहभागी होणार नाही, असं स्पष्टीकरण काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.


सेना- भाजपला शह देण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीसाठी आग्रही होतो. पण संजय निरुपम यांना आघाडीची गरज वाटत नाही, असं राणे म्हणाले.

शिवसेना बिथरली आहे. मंत्री म्हणतात आम्ही बॅगा भरुन तयार आहोत. मात्र मंत्र्यांच्या बॅगा कशाने भरल्या आहेत हे पाहावं लागेल, असा टोला राणेंनी लगावला.

मुंबई काँग्रेसमधील कलह

मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह दिवसेंदिवस वाढतोय. कारण, गुरुदास कामत यांच्यानंतर नारायण राणेदेखील मुंबईतील काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत.

कामतांप्रमाणेत राणे सुद्धा मुंबई काँगेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभारावर नाराज असल्याची माहिती आहे. आपण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी आग्रही होतो. पण, संजय निरुपमांना त्याची गरज वाटली नाही. त्यामुळं मुंबईच्या प्रचारासाठी संजय निरुपम सक्षम असल्याचा टोला राणेंनी लगावला आहे.

मात्र, मुंबई व्यक्तिरिक्त इतर सर्व ठिकाणी ते काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.

संबंधित बातम्या


नारायण राणे मुंबईतील प्रचारात सहभागी होणार नाहीत