मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत वाद एकदा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे मुंबईतील प्रचारात सहभागी होणार नाहीत.
गुरुदास कामत यांच्यापाठोपाठ नारायण राणेही मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे नारायण राणे मुंबईतील प्रचारात सहभागी होणार नाहीत. मात्र मुंबईव्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी राणे प्रचार सभा घेणार असल्याचं समजतं.
काँग्रेसची मैदानातील तोफ म्हणून नारायण राणे यांची ओळख आहे. राणेंनी विरोधकांवर तिखट शब्दांनी प्रहार केला आहे. परंतु निरुपम यांच्या कामावर राणे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच त्यांनी मुंबईत प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र या अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसला मुंबई महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.