मुंबई: मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना, भाजप नेत्यांच्या 'कृष्णकुंज'वरील फेऱ्या वाढल्या आहेत. कारण कालच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेल्यानंतर, आता भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाडही 'कृष्णकुंज'वर दाखल झाले. राज ठाकरेंच्या भेटीसाठी प्रसाद लाड यांनी त्यांचं निवासस्थान गाठलं.


भाजप नेत्यांच्या वाढत्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांणा उधाण आलं आहे.

राज ठाकरेंच्या भेटीसाठी आशिष शेलार 'कृष्णकुंज'वर

भेट राजकीय नाही असं काल आशिष शेलार यांनी सांगितलं होतं. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही भेट होत आहे. त्यामुळे निश्चितच राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना, भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपने उत्तर भारतीयांची मतं मिळवण्यासाठी छठपूजेचं आयोजन केलं होतं. त्यासाठी स्वत: मुख्यमंत्रीही उपस्थित राहिले होते.

त्यानंतर आता भाजपने थेट राज ठाकरेंची भेट घेऊन, शिवसेनेला एकप्रकारे धक्का देण्याचं काम केलं आहे.

संबंधित बातम्या
राज ठाकरेंच्या भेटीसाठी आशिष शेलार 'कृष्णकुंज'वर