'वजनदार' आज प्रेक्षकांच्या भेटीला, नोटबंदीचा फटका बसण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2016 09:12 AM (IST)
मुंबई: दिग्दर्शक सचिन कुंडलकर याचा वजनदार हा मराठी चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. तर दुसरीकडे हिंदीमध्ये फरहान अख्तरचा 'रॉक ऑन 2' प्रदर्शित होतो आहे. मात्र, या दोन्ही चित्रपटांना नोटाबंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे. 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर राज्यासह देशभरात सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांच्या परिणाम सिनेमागृहांवरही पाहायला मिळत आहे. सध्या अनेक ठिकाणचे सिनेमागृह ओस पडली आहेत. दुसरीकडे अद्यापही एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा असल्यानं प्रेक्षकांना सिनेमागृहात जाण्यासाठी सुट्टे पैसे नाहीत. त्यामुळे सिनेनिर्मात्यांनी 'बूक माय शो'वरून तिकिटं बूक करण्याचं आवाहन सिनेनिर्मात्यांनी केलं आहे.