महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेने आश्वासनांची खैरात करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेने वचननाम्याची रुपरेषा जाहीर करताच, भाजपनेही जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
मुंबई महापालिका सध्या रस्ते कर आकारते. एकूण करापैरी साधारण 13 टक्के कर रोड टॅक्समधून जमा होतो. त्यामुळे मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत रोड टॅक्स आकारणार नाही, असं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिलं आहे.
मुंबईकरांना 24 तास पाणी मिळत नाही, तोपर्यंत पाणी पट्टी आकाराली जाणार नाही, अशी भूमिका भाजपने जाहीरनाम्यात घेतली आहे.
500 चौ.फुटांच्या घरांना मालमत्ता कर नाही : उद्धव ठाकरे
मालमत्ता करमुक्तीची घोषणा आमची : आशिष शेलार
500 चौरस फुटांपर्यंतची घरं मालमत्ता करमुक्त करण्याची मागणी आपली असल्याचा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. मी आमदार म्हणून राज्य सरकारकडे ही मागणी केली होती. तसेच तिला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
आता भाजपच्या जाहीरनाम्यात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होईपर्यंत रस्ते टॅक्स घ्यायचा नाही अशी भूमिका आम्ही घेतली आहे, असं शेलार यांनी सांगितलं.
रस्ते टॅक्समधून महापालिकेला 500 ते 600 कोटी मिळतात, पण रस्त्यांची अवस्था तशीच असते. त्यामुळे महापालिकेच्या ‘टॅक्स टेररिझम’मधून मुंबईकरांना सुटका मिळावी,ही आमची भूमिका आहे. यानंतर आता काही जणांना उपरती होत आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
माफियांशी समझोत्याची चर्चा शक्य नाही : सोमय्या
‘माफियांशी समझौत्याची चर्चा होऊ शकत नाही. महापालिकेत माफियाबंदी स्वीकारावी लागणार आहे. राहता राहिला प्रश्न जाहीरनाम्याचा, तर शिवसेनेने आतापर्यंत काय केलं? महापालिकेतील गेल्या 22 वर्षांचा हिशोब द्यावा’, अशी मागणी सोमय्यांनी केली. शिवसेना आणि सेना नेत्यांची नोटाबंदीमुळे नाकाबंदी झाली आहे, त्यामुळे त्यांची अडचण समजू शकतो, अशी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली.
भाजप हा मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्र, देशात एक नंबरचा पक्ष आहे. कोणी मित्रपक्ष आमच्याबरोबर येत असेल तर त्यांना किती जागा द्यायच्या हा एक मुद्दा आहे. मात्र आम्ही कुणाकडे भीक मागत नाही तो काळ आता गेला, असा टोलाही किरीट सोमय्यांनी लगावली.
संबंधित बातम्या