भाजपचा मराठा आरक्षणाचा ठराव
एबीपी माझा वेब टीम | 05 Oct 2016 03:10 PM (IST)
मुंबई: आजपासून भाजपचे राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन मुंबईत सुरु होत आहे. या अधिवेशनात पंकजा मुंडे मराठा आरक्षणाचा ठराव मांडणार आहेत. आजपासून राज्य भाजप कार्यकारणीचं दोन दिवसांचं अधिवेशन सुरू होत आहे. दादरमधील वसंत स्मृतीत दुपारी 3 वाजता होणार कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यावेळी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनावेळी पंकजा मुंडे मराठा आरक्षणासंदर्भातील ठराव राज्य अधिवेशनात मांडणार आहेत.