भाजपच्या 114 जागांच्या यादीवर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2017 05:39 PM (IST)
मुंबई : भाजपने मुंबई महापालिकेसाठी तयार केलेल्या 114 जागांच्या यादीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. आज रात्री भाजप आणि शिवसेना एकमेकांची यादी आदान प्रदान करण्याची शक्यता आहे. मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी याबाबत आशिष शेलार यांच्यासोबत एक तासाहून अधिक काळ चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यादीवर शिक्कामोर्तब केलं.