मुंबई : एकीकडे सलमानच्या जामिनासाठी त्याचे हितचिंतक सर्व शक्ती पणाला लावत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या शक्तिप्रदर्शनाला याच जामिनाच्या निकालामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.


भाजप स्थापनादिनाचं औचित्य साधत उद्या 6 एप्रिल रोजी बीकेसी मैदानावर पक्षाचं जोरदार शक्तीप्रदर्शन आहे. मात्र, सर्व मीडियाच्या नजरा सलमानच्या जामिनाकडे असणार आहेत.

तसंच सलमानला जामीन मिळाल्यास तो लगेचच मुंबईची वाट धरेल. आणि जोधपूरनंतर सलमान पुन्हा मुंबईत कॅमेऱ्यांच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शाह शक्तिप्रदर्शनासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र सलमानचा जामीन भाजपचा घात करण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे भाजपचं टायमिंग जरा चुकलंच असं म्हणावं लागेल.

दुसरीकडे, भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या रॅलीला मुंबई ट्रॅफिकचा फटका बसला. अमित शाह मुंबई विमानतळावरुन बीकेसी मैदानाकडे रवाना झाले. यावेळी काढण्यात आलेली बाईक रॅली मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकली.