मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मध्यरात्री दोन वाजताच मुंबईत दाखल झाले. मुंबईत पोहोचल्यावर त्यांनी थेट भाईंदरमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी गाठली. इथे गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक सुरु आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि अमित शाह यांच्यात आज सकाळी चर्चा झाल्याची माहिती आहे. चर्चेचा तपशील मात्र कळू शकलेला नाही.
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आरएसएसने अयोध्यामधील राम मंदिराच्या मुद्द्यावर काय भूमिका घेतली, कोणती पावलं उचलील, याची माहिती पक्षाला देण्यासाठी अमित शाह मुंबईत आल्याचं म्हटलं जात आहे.
याशिवाय पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका, पक्षाची पुढील वाटचाल तसंच संघटनात्मक बांधणी यासारख्या विविध मुद्द्यांवर अमित शाहांची मोहन भागवत यांच्याशी चर्चा झाल्याचं कळतं.
दरम्यान, मोहन भागवर आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन संघांची भूमिका जाहीर करतील.