मुंबई: संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांना सांगा की तुम्हाला गावी जायचं असेल तर जा, आम्ही ट्रेन बुक केली आहे. तीन सीट बाकी ठेवल्या आहेत. तुम्हाला जायची तिकीट आम्ही देतो अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. मुंबई गोवा महामार्गावरून राजकारण तापलेले असताना खासदार संजय राऊत यांनी देखील सरकारवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं.


आमदार नितेश राणे म्हणाले की, "यापूर्वी आम्ही सहा ट्रेन सोडल्या आहेत. आम्ही 250 बसेस सोडतोय, रेल्वे गाड्या सोडतोय, गणपतीच्या काळात आम्ही या सेवा देतोय. टीका करणाऱ्यांनी किमान ट्रेन सोडून दाखवाव्यात. त्यांना गावी जायचं असेल तर त्यांच्यासाठी राखीव सीट ठेवली आहे."


गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) कोकणात (konkan) जाण्याची लगबग सध्या चाकरमान्यांची सुरु आहे. मुंबई भाजपच्या (Mumbai Bjp) वतीने चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी तीन दिवस सहा विशेष 'नमो एक्सप्रेस'ची ( Namo Express) व्यवस्था करण्यात आली आहे. 


आदित्य ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका 


आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, पेंग्विन जर कोकणात येत असेल तर लोकांनी किमान घरात चार एसी लावाव्यात. कारण पेंग्विन एसी शिवाय जगू शकत नाही.


संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका 


अडीच वर्षात रखडलेल्या कामांना मोदी जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.'खुर्चीवर बसलेली व्यक्ती बदलली, लफंगेगिरी सुरुच' असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात ठग आणि भामट्यांचं राज्य आलं असून चार तासांत मराठवाड्याचा विकास होतो का? असा सवाल विचारत संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.


मराठवाड्यासाठीच्या घोषणांनंतर शनिवारी चर्चा झाली ती संजय राऊतांची. शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये होती तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही छ. संभाजीनगरमध्ये होते. सरकारवर टीका करताना मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषेदत जाणार असं संजय राऊत म्हणाले आणि राऊत खरच पत्रकार परिषेदत जाणार का याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली. पण संजय राऊत गेलेच नाहीत. यावरुन मुख्यमंत्री शिंदेंनीही मग टोला लगावला. 



ही बातमी वाचा: