मुंबई: महापालिका निवडणुकांचा प्रचार संपण्यास आता अवघे चार दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला आता जोर चढला आहे. मुंबईतही प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, भाजपनं मुबंईत ‘हा माझा शब्द आहे’ हे नवं कॅम्पेन सुरु केलं आहे.


मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. सुरुवातीला शिवसेनेनं ‘डीड यू नो’ हे कॅम्पेन केलं होतं. तर ‘मी खरा मुंबईकर’ अशा पद्धतीचं कॅम्पेन भाजपनं केलं होतं. त्यानंतर आता शिवसेनेनं काहीच दिवसांपूर्वी ‘जे बोलतो, ते करुन दाखवतो’ हे कॅम्पेन सुरु केलं. त्यालाचा उत्तर म्हणून भाजपनं आता ‘हा माझा शब्द आहे’ हे कॅम्पेन सुरु केलं आहे.

दरम्यान, शिवसेनेनं आपल्या होर्डिंगवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापला आहे. तर भाजपने नव्या होर्डिंगवर मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींचा फोटो छापला आहे. या सर्व कॅम्पेनला मुंबईकर नेमकं काय उत्तर देणार हे येत्या काही दिवसातच समजेल.