मुंबई: मुंबईतील भाजपचे मुलुंडचे आमदार सरदार तारा सिंग यांच्या गाडीला गुरुवारी रात्री अपघात झाला.
भरधाव वेगाने येणाऱ्या त्यांच्या महिंद्रा एक्सयूव्ही गाडीने एका स्विफ्ट गाडीला आणि दुचाकीला धडक दिली. त्यानंतर ही गाडी थेट ट्रॅफिक पोलीस चौकीला धडकली.
ज्यावेळी अपघात झाला तेव्हा तारा सिंग यांचा चालक महेंद्र गुप्ती ही गाडी चालवत होता, तारा सिंह गाडीत नव्हते असं सांगण्यात येत आहे.
ही घटना नाहूर येथील सोनापूर सिग्नल जवळ घडली.
ज्यावेळी गाडीने धडक दिली त्यावेळी पोलीस चौकीमध्ये हेड कॉन्स्टेबल उमेश ईशी होते. ते जखमी झाले आहेत. तर या गाडीचा चालक महेंद्र गुप्ता हादेखील जखमी झाला आहे.
दोघांनाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
या अपघातामध्ये रस्त्यावरील 2 कुत्रेही ठार झाले. तसंच पोलीस चौकी पूर्णतः कोसळली आहे. आता हा अपघात नेमका कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
आमदार सरदार तारा सिंह
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजप आमदार सरदार तारा सिंग यांची गाडी पोलीस चौकीत घुसली
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
15 Sep 2017 11:30 AM (IST)
मुंबईतील भाजपचे मुलुंडचे आमदार सरदार तारा सिंग यांच्या गाडीला गुरुवारी रात्री अपघात झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -