मुंबई : शिवस्मारकाच्या भूमीपूजनाच्या उद्घाटनावरुन नाराज असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. सरकारमधील दोन मंत्री उद्धव ठाकरेंना सोहळ्याचं आमंत्रण देण्यासाठी थेट 'मातोश्री'वर जाणार आहेत.


शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी भाजपचा गाजावाजा


येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारचं भूमीपूजन होणार आहे. मात्र योग्य सन्मान मिळाला तरच भूमीपूजनाला जाणार, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.

शिवरायांचा पुतळा बनवायला मिळणं भाग्य समजतो : राम सुतार


उद्धव ठाकरेंची नाराजी समोर आल्यानंतर ती दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळेच भाजपचे दोन मंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी जाणार आहेत.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाला मच्छिमारांचा तीव्र विरोध


24 डिसेंबरला मोदींच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाआधीच शिवसेना-भाजपमधील नाराजी नाट्य दूर होते का? शिवसेना नेत्यांच्या मागणीप्रमाणे उद्धव ठाकरेंना मोदींच्या जवळ खुर्ची मिळते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवस्मारकासाठी 16 ठिकाणाहून माती आणि पाणी, सर्व राजघराण्यांना निमंत्रणM