या व्हायरल व्हिडीओमध्ये रवींद्र चव्हाण हे रस्त्यात उभे राहून फोनवर शिवीगाळ करताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ अंदाजे महिनाभरापूर्वीचा असल्याची चर्चा आहे. या फोन कॉलवर ते शिवीगाळ नेमकी कुणाला करत आहेत, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.मात्र सूत्रांच्या माहितीनुसार ते पोलीस अधिकारी किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ करत असल्याची माहिती समोर येत आहे.
रवींद्र चव्हाण हे यापूर्वीही डोंबिवलीत फेरीवाल्यांना शिवीगाळ करताना कॅमेरात कैद झाले होते. तर उल्हासनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकीवेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढल्याप्रकरणीही ते वादात सापडले होते.
त्यानंतर आता पुन्हा त्यांचा हा वादग्रस्त व्हिडीओ समोर आला असून आता तरी पक्ष या सगळ्या गोष्टींची दखल घेतो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.