मुंबई : एकीकडे भाजप अध्यक्ष अमित शाह यांना शिवसेनेसोबत युतीची खात्री आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अचानक युतीसंदर्भातली आपली भाषा बदलल्याचं दिसत आहे. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना सोबत आली तर ठीक नाही तर आपण समर्थ आहोत, असं विधान मुख्यमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी केलं आहे.


2019 लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप युती, अमित शाहांना खात्री

'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी तीन महिन्यांनी भाजपची महाबैठक झाली. या बैठकीला सर्व आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. तीन राज्यांमधील काँग्रेसच्या विजयाने मनोधैर्य खच्चीकरण झालं नाही ना हे तपासण्याचं काम बैठकीत करण्यात आलं. तसंच सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन  आगामी निवडणुकीसाठी कशी तयारी करावी या गोष्टीवर बैठकीत खलं झालं.

शाह-फडणवीसांची बैठक, शिवसेनेशी जाहीर वाद टाळण्याची भूमिका?

यावेळी भाजप नेत्यांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "काँग्रेसच्या विजयाने खचू नका. मीडियातील बातम्या ऐकून चर्चा करु नका. काँग्रेस राफेलवरुन प्रचंड कॅम्पेनिंग करेल, त्याला बळी पडू नका. निवडणुकीच्या मिशन मोडमध्ये आपल्याला जायचं आहे. पक्षाचा हाच रोडमॅप राष्ट्रीय अध्यक्षांनी ठरवला आहे. महाराष्ट्रात भाजपच नंबर वन आहे. शिवसेना एकटी लढली तरी आपण समर्थ आहोत, सोबत आली तर वेल अॅण्ड गुड. भाजपच्या बाजूने सकारात्मक चर्चा आहे."

2019 लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप युती, अमित शाहांना खात्री

2019 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला. शिवसेना-भाजपची युती लोकसभा निवडणुकांना सामोरी जाईल, अशी खात्रीही शाह यांना वाटते. विरोधकांची महाआघाडी म्हणजे एक भ्रम आहे, असा घणाघात करताना अमित शाहांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा केंद्रात सत्ता मिळवण्याचा विश्वासही व्यक्त केला. 'महाआघाडी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत आम्ही त्या सर्वांचा पराभव केला होता. ते सर्व प्रादेशिक नेते आहेत आणि एकमेकांना साथ देऊ शकत नाहीत' असंही अमित शाहांना वाटतं. शिवसेना-भाजपची युती लोकसभा निवडणुकांना सामोरी जाईल, असा विश्वासही अमित शाहांनी व्यक्त केला. शिवसेनेसोबत बोलणी सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.