मुंबईमध्ये कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलंय.
महापौर निवडणूक आणि आकड्यांचं गणित
दरम्यान भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक कोकणभवनला जाऊन गट नोंदणी करणार आहेत.
मुंबईत मनपा निवडणुकीत शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7, समाजवादी पक्षाला 6, MIM 2 आणि अपक्षांना 6 जागा मिळाल्या आहेत.
गीता गवळींचा भाजपला पाठिंबा
कालपर्यंत शिवसेनेच्या संपर्कात असलेल्या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आणि डॉन अरुण गवळीची मुलगी गीता गवळी यांनी आता भाजपला पाठिंबा दिला आहे.
गीता गवळी यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली.
गीता गवळी आज कोकण भवनात भाजपसोबत जाऊन गटनोंदणी करणार असल्याचं कळतं. त्यामुळे गीता गवळी यांना आपल्या बाजूने वळवण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलं आहे.
गडकरींचा इशारा
मुंबई महापौरपदासाठी एकत्र यायचं की नाही याचा निर्णय शिवसेनेनं करायचा आहे. शिवसेना सोबत आली नाही तर भाजपला सर्व पर्याय खुले आहेत. असा सूचक इशारा केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरींनी दिलाय.
संबंधित बातम्या
मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा
गीता गवळींना वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची अरुण गवळींकडे सेटिंग?
...म्हणून उद्धव ठाकरे दानवेंच्या मुलाच्या लग्नाला जाणार नाहीत!
BMC election result : मुंबई महापालिका वॉर्डनिहाय निकाल
मुंबईत 30-35 जागांवर शिवसेनेला मनसे फॅक्टर महागात
शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ
मुख्यमंत्री दिल्ली दरबारी, शिवसेनेसोबतच्या कोंडीवर चर्चा?
शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ
दगाफटक्याची चिंता नाही, महापौर शिवसेनेचाच : अनिल परब
शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले
युती होणार का? आशिष शेलार म्हणतात…
राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला?
तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87
युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण