नवी मुंबई: मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला नवी मुंबईच्या नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. कामरान उर्फ रफिक शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. कामरान आणि त्याच्या साथीदारांनी नवी मुंबई आणि लगतच्या परिसरातून अनेक दुचाकी वाहनं चोरली होती.
अखेर खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी कामरानला बेड्या ठोकल्या आहेत. कामरानचा साथीदार इस्माईल शेखही पोलिसांच्या हाती लागला आहे. तसंच आरोपींकडून तब्बल 17 दुचाकी वाहनं जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
रेल्वे स्थानकांजवळ पार्क केलेल्या मोटारसायकली ही टोळी चोरत असत. सीसीटीव्ही मधील हालचालींचा अभ्यास करून पोलिसांनी या टोळीचा माग काढला. या टोळीमधील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत खैरे यांनी दिली.