मुंबई : बाईकवरुन पर्स चोरणाऱ्या चोरट्यांनी नागपूरहून मुंबईत आलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं. 25 दिवसांच्या दक्षिण अमेरिका सहलीवर जाताना पासपोर्ट चोरी झाल्याने मिश्रा दाम्पत्याच्या ट्रीपला ब्रेक लागला.
नागपूरचे 71 वर्षीय रमाकांत मिश्रा 68 वर्षीय पत्नी शोभासह सोमवारी मुंबईला आले होते. रात्रीचं विमान पकडून ते दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना, ब्राझिल, चिली, पेरु या देशांना भेट देणार होते.
मिश्रा दाम्पत्य मुंबईतील बीकेसी भागात राहणाऱ्या मित्राकडे थांबले होते. विमानतळावर जाण्यासाठी ते अर्धा तास टॅक्सीची वाट पाहत उभे होते. अखेर कंटाळून रिक्षा पकडून ते रवाना झाले.
साडेसात वाजताच्या सुमारास वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर विमानतळाच्या दिशेने वळण्यापूर्वी दोघे बाईकस्वार त्यांच्या रिक्षाजवळ आले. शोभा मिश्रा यांच्या मांडीवर असलेली पर्स उचलून बाईकस्वार धूम पळाले. त्या पर्समध्ये दोघांचे पासपोर्ट, व्हिसा, ब्लूटूथ डिव्हाईस आणि पाच हजार रुपयांची रोकड होती. 'मिड डे' वर्तमानपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
रिक्षाचालकाने त्यांना जवळ उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसाकडे नेलं. पोलिसाने त्यांना अंधेरी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. तिथे असेलल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने दाम्पत्यासह घाटनास्थळाला भेट दिली. अखेर विलेपारले पोलिसात तक्रार दाखल केली.
अमेरिकेला जाताना पर्स चोरीला, वृद्ध दाम्पत्याचे पासपोर्ट गहाळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Sep 2018 11:43 PM (IST)
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर विमानतळाच्या दिशेने वळण्यापूर्वी दोघे बाईकस्वार रिक्षाजवळ आले आणि शोभा मिश्रा यांच्या मांडीवर असलेली पर्स उचलून धूम पळाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -