बंदूक दाखवताना गोळी सुटली, मित्राच्या छातीत घुसली
एबीपी माझा वेब टीम | 13 Aug 2016 08:10 AM (IST)
मुंबई : मुंबईच्या वडाळा परिसरात गोळीबाराची अजब घटना घडली. मित्राला बंदूक दाखवताना, गोळी सुटल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. वडाळा टीटी परिसरात ही घटना घडली. मंगल सिंह ठाकूर नामक 25 वर्षीय युवकाच्या बंदुकीतून गोळीबार झाला आहे. या गोळीबारात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. काय आहे प्रकरण? मंगल सिंह ठाकूर आपली बंदूक मित्राला दाखवत होता. त्यावेळी चुकून बंदुकीतून गोळी सुटली आणि मित्राच्या छातीत घुसली, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. दरम्यान याप्रकरणी मंगलसिंह ठाकूरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याजवळ असलेली बंदूक बेकायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.