मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या  (महाज्योती) माध्यमातून पीएचडी करणा-या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी  दिलासादयक बातमी आली आहे. महाज्योतीच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांच्या मासिक शिष्यवृत्तीत घसघशीत वाढ  करण्यात आली आहे. 21 हजारांची मासिक शिष्यवृत्ती  31 हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएचडीकरता निवडलेल्या 753  विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.


'महाज्योती' तर्फे विद्यार्थ्यांना विनमूल्य स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. याकरता साडेचार कोटींचा अतिरीक्त भार सरकारच्या तिजोरीवर येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी 35 कोटींचा वार्षीक खर्च आहे. महाज्योतीतर्फे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 21 हजार रुपयांची मासिक शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याची मागणी विद्यार्थ्यांन केली होती. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले. अखेर विद्यार्थ्यांच्या या मागणीला यश मिळाले असून आता शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे. 


महाज्योतीची स्थापना


विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन करण्यासाठी   22 ऑगस्ट 2019 ला महाज्योती संस्थेची स्थापन केली. माध्यमातून या समाजसमूहांच्या विकासासाठी आता अधिक नियोजनपूर्वक प्रयत्न करण्याचं महाज्योतीचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं होतं.


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI