मुंबई : मुंबईतील एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अंधेरी स्टेशनसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अंधेरी रेल्वे स्टेशनवरील एक जिना महिलांसाठी आरक्षित केला जाणार आहे.
गर्दीच्या वेळी फुटओव्हर ब्रिजला जोडणारा जीना गर्दीच्या वेळी खास महिलांसाठी आरक्षित करण्याचा निर्णय अंधेरी स्टेशनच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
अंधेरीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 ला जोडणारा चर्चगेट दिशेकडचा जिना सकाळी अर्धा तास तर संध्याकाळी एक तास महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. यामुळे गर्दीचे नियोजन योग्य पद्धतीने झाल्यास इतर प्लॅटफॉर्मवरही अशाच प्रकारची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
मुंबईतील अंधेरी स्टेशनवर महिलांसाठी खास जिना आरक्षित
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Oct 2017 06:42 PM (IST)
गर्दीच्या वेळी फुटओव्हर ब्रिजला जोडणारा जीना गर्दीच्या वेळी खास महिलांसाठी आरक्षित करण्याचा निर्णय अंधेरी स्टेशनच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -